लेखक : उन्मेष गुजराथी
18 Sep, 2023

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
दिल्ली येथे महाराष्ट्र्र सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) आहे. या सरकारी वास्तूत मुख्यमंत्री, मंत्री इतकेच काय पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कायमच वास्तव्य असते. याच वास्तूत अभिषेक पांडे (Abhishek Pandey ) या भामट्याने १९ ऑगस्ट रोजी बोगस पीएचडी पदव्या देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात होता, त्यामुळे या कार्यक्रमाला सरकारी कार्यक्रमाचे स्वरूप आणण्यात आयोजक पांडे यशस्वी झाला. या भामट्याला साथ होती ती सदनातील सरकारी अधिकाऱ्यांची.
या सरकारी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला संपूर्णपणे सहकार्य केले. त्यामुळे हा सोहळाही थाटामाटात पार पडला. मुळात या कार्यक्रम पत्रिकेवर हरियाणाचे गृहमंत्री दुष्यन्तकुमार चौटाला यांचे प्रमुख पाहुणे म्हणून नाव टाकण्यात आले. याशिवाय इतरही अनेक सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, निवृत्त न्यायाधीश यांची नावे टाकण्यात आलेली आली. प्रत्यक्षात यापैकी कोणीही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र यावेळी व्हीआयपी, मंत्री किंवा सेलेब्रिटी येणार आहेत, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आलेली होती.
हा सोहळा Theophany International University या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला होता. ही संस्था किंवा कथित युनिव्हर्सिटी ‘हैती’ (Haiti) या देशातील असल्याचा दावा करते. मात्र जगातील कोणत्याही देशात या कथित विद्यापीठाची नोंद नाही, असे स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला आढळून आलेले आहे.
बोगस पीएचडी, पुरस्कार यांच्या नावाने नामांकित शाळेतील मुख्याध्यापकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. या सर्व संस्थेचा कारभार हा अभिषेक पांडे हाताळत आहे. हाच पांडे University of Macaria, Theophany University, Maryland State University या विविध कथित बोगस विद्यापीठांच्या नावाने पीएचडी पदव्या वाटतो.
या भामट्याने Theophany International University या बोगस विद्यापीठाच्या वेबसाईटवर सूचिबद्ध केलेली सर्व पत्रे बोगस आहेत. ती सर्व पत्रे वाचता येणार नाहीत, अशा पद्धतीने अपलोड करण्यात आलेली आहेत. यातील एक प्रमाणपत्र थियोफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी म्हणून नोंदणी दर्शवते आणि दुसरे थेओफनी विद्यापीठ म्हणून दाखवते.
अभिषेक पांडे हा या सर्व गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे. त्याने त्याच्या हाताखाली अनेक एजन्ट नेमलेले आहेत. पांडे हा प्रत्येक पीएचडीच्या प्रमाणपत्रासाठी किमान १५ हजार रुपये घेतो. आणि उरलेले बदमाश एजन्ट हे २५ हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत रक्कम उकळतात.
अभिषेक पांडे या भामट्याने महाराष्ट्र सदन, पोलीस, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ( UGC) यामधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल होत नाही.
A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:
► The Open International University of Complementary Medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zoroastrian University,
► Mahatma Gandhi Global Peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO)
► Nelson Mandela Nobel Award Academy (NGO)
► Diplomatic Mission Global Peace (NGO)
► Vinayaka Missions Singhania.
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Dadasaheb Phalke Icon Awards Films: NGO
► World Human Protection Commission- NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► University of Macaria
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for Peace and Education
► National Global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► The University of Macaria
► Theophany University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
► Central Christian University


संबंधित लेख व घडामोडी
Government Favoring Adani!
...Now Preparing to Give Land of Aksa Village Unmesh Gujarathi Sprouts Exclusive Sprouts Special Investigative Team Reveals Strong Opposition to Adani’s Dharavi Redevelopment Project in Maharashtra. Protests Erupt as Villagers Resist Survey for Dharavi Redevelopment....
GST Evasion Scandal Unearthed in Hiranandani Group Housing Societies
Sprouts Special Investigation Team, Led by Unmesh Gujarathi, Exposes Tax Fraud Unmesh Gujarathi Sprouts News Exclusive The Sprouts Special Investigation Team (SIT), under the leadership of investigative journalist Unmesh Gujarathi, has unveiled a significant GST...
Will US Consulate Act Against Fake Paper Universities?
Sprouts SIT's Exclusive Expose on Fake Doctorates Unmesh Gujarathi Sprouts Exclusive Mumbai's most trusted newspaper, Sprouts, through its Sprouts Special Investigation Team, has uncovered a disturbing trend: the rise of fraudulent 'paper universities' in India...
अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी
आमची समाजमाध्यमं
Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque