रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ५.९ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य – फिच

लेखक केतन जोशी

15 Jun, 2022

पीटीआय, नवी दिल्ली : चिंताजनक रूप धारण करीत असलेली महागाई पाहता रिझव्‍‌र्ह बँकेकडून चालू वर्षांत डिसेंबर २०२२ पर्यंत रेपो दरात ५.९ टक्क्यांपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे कयास जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जने मंगळवारी व्यक्त केला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि त्यापरिणामी खनिज तेलाच्या वाढत्या किमती यासारख्या बाह्य प्रतिकूल घटना याचबरोबर जगभरातील मध्यवर्ती बँकाकांडून महागाई नियंत्रणासाठी आक्रमकपणे करण्यात येत असलेल्या व्याज दरवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो आहे.

यामुळे देशांतर्गत पातळीवर वाढती महागाई पाहता रिझव्‍‌र्ह बँक चालू वर्षांत रेपोदर ५.९ टक्क्यांपर्यंत आणि २०२३ च्या अखेरीस ६.१५ टक्क्यांपर्यंत वाढवत नेण्याची शक्यता आहे. जो आधी ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच वर्ष २०२४ मध्ये तो याच पातळीवर कायम राखला जाण्याची शक्यता आहे, असे फिच रेटिंग्जने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालाने केले आहे.

गेल्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण समितीच्या नियोजित बैठकीआधीच तातडीने रेपोदरात ४० आधारिबदूची वाढ केली. तसेच सरलेल्या आठवडय़ात थेट अर्ध्या टक्क्याची वाढ करत रेपोदर ४.९० टक्क्यांवर नेला आहे. तरीही महागाईची चढती कमान कायम असून घाऊक महागाई दर सरलेल्या महिन्यात विक्रमी १५.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

किरकोळ महागाईकडून किंचित दिलासा मिळाला असला तरी आगामी काळात महागाई दर चढाच राहण्याचा कयास व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी ‘फिच रेटिंग्ज’ने गेल्या आठवडय़ात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीच्या दरासंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ७.८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.