यूजीसीच्या सहकार्याने मानद डॉक्टरेटच्या बोगस पदव्या विकण्याचा सुळसुळाट

लेखक : उन्मेष गुजराथी

8 Apr, 2023

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

भारतात मानद डॉक्टरेटच्या बोगस पदव्या  (Honorary PhD ) विकण्याचा सुळसुळाट झालेला आहे. याप्रकरणी वारंवार तक्रारी करून सुद्धा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, पोलीस प्रशासन व संबंधित सरकारी यंत्रणा ( AICTE, MHRD) हे त्यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे शेकडो जणांची फसवणूक होत असल्याचेआढळून येत आहे. या गोरखधंद्यातील सत्यता उघडकीस आणणारा ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमचा हा स्पेशल रिपोर्ट.

पियुष पंडित (Peeyush Pandit) हा भामटा इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी – International Internship University (IIU) या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आहे. या विद्यापीठाची केवळ भारतातच नव्हे तर जगातील कोणत्याही देशात नोंदणी नाही. सपशेल बोगस विद्यापीठ चालवणाऱ्या या भामट्याने आतापर्यंत देशविदेशातील शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत.

या भामट्याने ‘स्वर्ण भारत परिवार ट्रस्ट’ ( Swarna Bharat Parivar Trust) ही स्वयंसेवी संस्था काढलेली आहे. या संस्थेच्या नावानेही हा अवार्ड फंक्शनचे कार्यक्रम घेतो, व त्याआडून हा मानद डॉक्टरेटच्या बोगस पदव्या विकतो. मात्र नियमानुसार कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेला मानद डॉक्टरेट देण्याचा अधिकार नाही.

दिनांक ९ एप्रिल रोजी या भामट्याने दिल्ली येथील गाझियाबाद येथे बोगस पीएचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मात्र पंडित याने अगोदरच युजीसी व पोलीस प्रशासनाशी ‘अर्थ’पूर्ण संबंध ठेवल्यामुळे हा भामटा खुलेआम कार्यक्रम घेत आहे.

श्री. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फाउंडेशन’ ही अशीच एक एनजीओ. वरकरणी ही संस्था अवार्ड फंक्शन, फॅशन शो आयोजित करते, मात्र आतून ही संस्था चक्क बोगस मानद पीएचडी वाटपाचे कार्यक्रम करते. कल्याणजी जाना Kalyanji Jana हा भामटा या संस्थेचा संचालक आहे. हा भामटा कधी दुबईलाही कार्यक्रम घेतो व बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम करतो.

हल्ली भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, मदर तेरेसा यांसारख्या महापुरुषांच्या नावाने स्वयंसेवी संस्था किंवा बोगस युनिव्हर्सिटी काढण्यात येतात व त्यांच्यामार्फत पेड पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी ठराविक रक्कम आकारली जाते. ती रक्कम मिळाल्यानंतर अगदी रिक्षेवाल्यालाही अगदी दादासाहेब फाळके यांच्या नावाने अवॉर्ड दिले जाते. इतकेच नव्हे मानद डॉक्टरेटही दिली जाते. याविरोधात ‘स्प्राऊट्स’ने रान उठवले, त्यामुळे या संस्था त्यांच्या अवार्ड फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात, मात्र बोगस पीएचडी वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकायला घाबरतात, असे आढळून येते.

मधू क्रिशन (Madhu Krishan ) हा या सर्व भामट्यांचा गुरु. आतापर्यंत याने हजारो जणांना होलसेलमध्ये बोगस पीएचडी विकलेल्या आहेत. राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेला राज्यपालांचा सचिव उल्हास मुणगेकर याचा या मधू क्रिशनशी खास ‘दोस्ताना’ आहे. त्यामुळे हा वारंवार राजभवनात येतो व राज्यपालांबरोबर ब्रेकफास्ट करतो. चर्चा करतो. या सर्व भामट्यांनी या गोरखधंद्यातून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी, कथित अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर, मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा (Vivek Bindra), लोकेश (आचार्य लोकेश मुनी म्हणून मिरवतात ) ‘ब्राईट आऊटडोअर मीडिया’चे संचालक योगेश लखानी (Yogesh Lakhani ) बू अब्दुला ( Bu Abdullah), मारवाह स्टुडिओचे संचालक संदीप मारवाह (Sandeep Marwah ) या सर्वांनी बोगस मानद पीएचडी घेतलेल्या आहेत व ते स्वतःच्या नावापुढे डॉक्टरेट लावून समाजाची दिशाभूल करीत आहेत.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अडचणीत*
 
• महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी सवंग प्रसिद्धीसाठी मानद डॉक्टरेट घेतली. मात्र ही डॉक्टरेट नियमबाह्य व  सरकारी नियमांचा (Code of conduct ) भंग करणारी आहे. त्यामुळेच डी वाय पाटील या विद्यापीठाच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर हे सोमवारी याचिका दाखल करणार आहेत.

• वाशी येथील डी वाय पाटील हे विद्यापीठ अगोदरच वादग्रस्त व बदनाम आहे. या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुख पदावर महेशकुमार नावाचा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची “डॉक्टर’ ही पदवी तर सोडा दहावी व बारावीची प्रमाणपत्रेही सपशेल बोगस आहे.

• मुख्यमंत्री शिंदे यांच्या बेकायदेशीर डॉक्टरेटच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील नामांकित व ज्येष्ठ वकील सतीश तळेकर हे या प्रकरणाची न्यायालयात कायदेशीर बाजू मांडणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण मुख्यमंत्री शिंदे व या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.