मोहनबुवा रामदासी यांनाही सुटला बोगस पीएचडीचा मोह

लेखक : उन्मेष गुजराथी

24 Jun, 2023

‘जय जय रघुवीर समर्थचा गजर’ करीत समर्थ रामदास स्वामींनी अध्यात्म व बलोपासनेचा संदेश दिला. समर्थांच्या या कार्याचा प्रसार सध्या खातगाव येथील समर्थ रामदास स्वामी मठाचे अधिपती मोहनबुवा रामदासी करीत आहेत. मात्र या बुवांनाही नावापुढे डॉक्टर लावण्याचा मोह सुटला नाही. त्यामुळेच एका बोगस पीएचडी विकणाऱ्या भामट्याने त्यांना बोगस मानद पीएचडी विकल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

समर्थ भक्त व दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार म्हणून मोहनबुवा रामदासी (Mohanbuva Ramdasi ) यांची ख्याती आहे. या बुवांनाही पीएचडी या पदवीचा मोह सुटला. त्याचाच फायदा सूर्यकांत नीळकंठ राऊळ ( Suryakant Nilkanth Rawool ) या भामट्याने घेतला.

या भामट्याची वर्ल्ड मिस्टिक सायन्स इन्स्टिट्यूट (World Mystic Science Institute (opc) Private Limited ) नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. वास्तविक कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा स्वयंसेवी संस्थेला पीएचडी देण्याचा अधिकार नाही. तरीही आजतागायत या भामट्याने शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्याची माहिती पुराव्यासह आलेली आहे.

मोहनबुवा रामदासी यांच्याप्रमाणेच श्री. श्री. रविशंकर (Sri Sri Ravi Shankar), बिशप थॉमस डाबरे (Bishop Thomas Dabre), ‘अहिंसा विश्व भारती’ (Ahimsa Vishwa Bharti) या स्वयंसेवी संस्थेचे ट्रस्टी लोकेश (Acharya Lokesh Muni) या कथित अध्यात्मिक व्यक्तींनीही बोगस पीएचडी मिळवल्या. त्याचप्रमाणे मोटिव्हेटर विवेक बिंद्रा (Vivek Bindra), स्नेह देसाई (Sneh Desai) पासून ते ठाण्यातल्या संतोष कामेरकर ( Santosh kamerkar ) या सर्वांनीही बोगस पीएचडी घेतल्या व जनतेची दिशाभूल करीत आहेत.

डॉ. विवेक (Dr. Vivek) मधू क्रिशन (Madhu Krishan), पियुष पंडित (Peeyush Pandit ), कल्याणजी जाना (Kalyanji Jana), कुमार राजेश (Kumar Rajesh), घनश्याम कोळंबे ( Ghanshyam Kolambe), सूर्यकांत नीळकंठ राऊळ ( Suryakant Nilkanth Rawool ) हे भामटे, बोगस पीएचडी विकण्याचे कार्यक्रम घेत असतात. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grants Commission) अधिकारी, स्थानिक पोलीस या सर्वांचे बोगस पीएचडी विकणाऱ्यांशी ‘आर्थिक संबंध’ आहेत, त्यामुळेच बोगस पीएचडी विकण्याचा हा गोरखधंदा खुलेआम चालू आहे.

A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:

► The Open International University of complementary medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zoroastrian University,
► Mahatma Gandhi Global Peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO).
► Nelson Mandela Nobel Award Academy – NGO
► Diplomatic Mission Global Peace – NGO
► Vinayaka Missions Singhania.
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Dadasaheb Phalke Icon Awards Films – NGO
► World Human Protection Commission- NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► University of Macaria
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for peace and Education
► National global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► The University of Macaria
► Theophany University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
►Central Christian University

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque
मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.