महाबळेश्वरमधील गुंडगिरी मोडून काढा!

लेखक : उन्मेष गुजराथी

31 Dec, 2022

हैद्राबादमधील नवाब यांच्या वारशाची गृहमंत्र्यांकडे मागणी

उन्मेष गुजराथी
जनहितवादी Exclusive

महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील थंड हवेतील बंगल्यांची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत. यातील काही जुने बंगले हे पारशी, कॅथलिक रहिवाशांचे आहेत. त्यांच्या बंगल्याना सध्या सोन्यापेक्षाही अधिक भाव आलेला आहे. त्यामुळे स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या काही लोकप्रतिनिधींनी या बंगल्यांचा बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे, अशी धक्कदायक माहिती हैद्राबाद येथील निजामाचे वंशज नवाब मीर बरकत अल्लीखान बहादूर यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली.

महाबळेश्वर येथे हैद्राबाद येथील निझामाचा ‘वूडलँड’ नावाचा आलिशान बंगला आहे. आजमितीला या बंगल्याची किंमत ही २५० कोटी रुपयांहून अधिक आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ब्रिटिशांनी हा बंगला हैद्राबाद येथील नवाबांचे वारस म्हणून मीर बरकत अल्लीखान बहादूर यांना ९९ वर्षांच्या करारावर दिला होता. मात्र कालांतराने दिलीप ठक्कर यांनी खोटी कागदपत्रे बनवले व हा बंगला बळकावला, असा गंभीर आरोप नवाब मीर अल्लीखान बहादूर यांनी केला आहे.

ठक्कर यांनी या बंगल्यात स्थानिक नगरसेवक कुमार गोरक्षनाथ शिंदे याला केअरटेकर म्हणून ठेवले होते. शिंदे यांची पत्नी विद्यमान नगराध्यक्ष आहे. याशिवाय स्वतः शिंदे यांना दोन वेळेला तडीपारीची शिक्षा झाली होती. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. या दहशतीमुळेच ठक्कर यांनी शिंदे या गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीला केअरटेकर म्हणून ठेवले होते. आजही शिंदे यांनी अनेक बंगले त्यांच्या गुंडगिरीच्या बळावर बळकावले आहेत. या सर्वांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवाब यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

‘वूडलॅण्ड’ बंगल्याला सील, पोलीस बंदोबस्तात घेतला ताबा
शिंदे हे त्यांच्या पत्नीसह ‘वूडलँड’ बंगल्यात बेकायदेशीरपणे रहात होते. मात्र सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ही गुंडगिरी मोडून काढली. त्यांच्या आदेशाने तहसीलदार सुषमा चौधरी यांनी पोलीस बंदोबस्तात धाडसी कारवाई केली. यावेळी शिंदे यांनी दादागिरी करण्याचा प्रयन्त केला. मात्र ही दादागिरी मोडून काढण्यात आली व हा बंगला सील करण्यात आला.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.