बेकायदेशीर औषध कंपनीच्या माफियांना FDA चा आशीर्वाद

लेखक : उन्मेष गुजराथी

24 Jan, 2023

उन्मेष गुजराथी 
स्प्राऊट्स Exclusive 
 
पुण्यातील औषध कंपनीने अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी ‘आर्थिक’ हितसंबंध जोपासले व बेकायदेशीरपणे औषधे निर्माण करुन कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी कोणतीही कारवाई केलेले नाही, याऊलट या कंपनीला कायदेशीर संरक्षण देण्याचे काम चालू केलेले आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेसिगेशन टीमला आढळून आलेले आहे. 
 
पुणे तालुक्यातील वाकड येथे या कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात विनापरवाना औषधे बनविण्यात येतात, त्यामुळे लाखो रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे, अशा असंख्य तक्रारी येथील रहिवाशांनी अन्न व प्रशासन विभागाकडे केला. मात्र या विभागाने या तक्रारींकडे कानाडोळा केला. अखेर तक्रारदारांच्या मागणीमुळे ‘स्प्राऊट्स’ने हे प्रकरण उघडकीस आणले.  स्प्राऊट्सच्या टीमने त्याचा सरकार दरबारी पाठपुरावा केला. 
 
अखेर अन्न व प्रशासन विभागाने (Food and Drugs Administration) या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांना अप्रमाणित औषधांचा साठा आढळून आला. मात्र हे प्रकरण त्वरित ‘मॅनेज’ करण्यात आले, व त्याच्या मालक व संबंधितांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. यासंबंधी वारंवार तक्रारीही करण्यात आल्या, मात्र तरीही या विभागातील अधिकाऱ्यांनी कंपनीचे मालक प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध चालूच ठेवले. त्यांच्या कृपेमुळे आजही हा कारखाना चालूच आहे व तेथे बेकायदेशीर औषधे बनवणेही चालूच आहे. 
 
आरोपी मोकाटच 
प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल हे Ace Remidies या कंपनीचे मालक आहे. हे बनावट औषधे तयार करतात व त्याची विक्रीही करतात. या दोघांवर भारतीय दंड संहिता कलम २७४, २७६, ४१९ व ४२० नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. तसेच द कंपनी ऍक्ट २०१३ मधील कलम ११९, १७२, ४१९ व इतर विहित तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई होणे आवश्यक होते, मात्र ही चौकशी या अधिकाऱ्यांकडून ‘मॅनेज’ करण्यात आली. त्यामुळेच हे अवैधरित्या औषधे विकणारे आरोपी मोकाट फिरत आहेत व खुलेआम अवैधरित्या औषधांची विक्रीही करीत आहेत.
 
‘इंडियामार्ट’मध्ये अवैध औषधांची विक्री
विनापरवाना निर्माण केलेल्या या औषधांची आजही www.indiamart.com या वेबपोर्टलवर विक्रीही चालू आहे. याबाबत ‘स्प्राऊट्स’ने वाचाही फोडली होती. त्यानंतर India Mart ने ‘स्प्राऊट्स’ला पत्रही पाठवले होते. मात्र त्यानंतरही या बेकायदेशीररीत्या केलेल्या औषधांची विक्री चालूच आहे.     
 
बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

अवैधरित्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांच्या खरेदी- विक्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे, यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.