फेक पीएचडी विकण्यासाठी आता निवृत्त न्यायाधीशांचा वापर

लेखक : उन्मेष गुजराथी

15 Dec, 2022

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बोगस ऑनररी पीएचडी विकण्याचा गोरखधंदा उघडपणे चालू आहे. या धंद्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी आता काही विद्यापीठे चक्क निवृत्त न्यायाधीशांचा गैरवापर करु लागलेली आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने ( एसआयटी ) मिळवलेली आहे.

University of Macaria हे बोगस विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ रशियामधून चालवले जाते, असा विद्यापीठाचा दावा आहे. मात्र या विद्यापीठाच्या जागेवर भलतेच विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने दिलेला संपर्क क्रमांक हा युएसएचा आहे. या विद्यापीठाला भारताची तर सोडा पण रशियाचीही मान्यता नाही, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला मिळालेली आहे.

या बोगस विद्यापीठाने दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटर ( India Habitat Center ) येथे १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मध्य प्रदेशमधील निवृत्त न्यायाधीश अमन मलिक (Aman Malik ), ऍडव्होकेट रोहित पांडे (Rohit Pandey ) हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. पांडे हा ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चा सहसचिव असल्याचे सांगतो व खुलेआम बोगस पीएचडी विकतो. या भामट्याची सनद त्वरित रद्द करण्यात यायला हवी.

मध्यप्रदेशच्या इंदोर येथील ‘कौटिल्य अकेडमी’चे Shridhant Joshi यांच्यासह अनेकांनी या बोगस ‘पीएचडी’चा लाभ घेतला.

‘स्प्राऊट्स’च्या वतीने या गंभीर प्रकरणाची तक्रार युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे चेअरमन एम. जगादेश कुमार यांच्याकडे करण्यात येणार आहे. याशिवाय रशियाच्या दिल्ली येथील एम्बसी व रशियाच्या शिक्षण विभागात तक्रार करुन पाठपुरावा करण्यात येणार आहे.

बोगस ऑनररी पीएचडी वाटताना पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलमध्ये एखादा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी आणला जातो व त्याच्या हस्ते बोगस पीएचडी वाटल्या जातात. मध्यंतरी श्री. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कनिष्ठ बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते बोगस पीएचडी वाटल्या, त्याचा पर्दाफाश सर्वप्रथम ‘स्प्राऊट्स’ने केला.

राजभवनात तर बोगस पीएचडी होलसेलमध्ये विकणारे कायमच सत्कार समारंभ करीत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमबाह्य पद्धतीने लादलेले चिटणीस उल्हास मुणगेकर हे या टोळीत सामील आहेत. त्यामुळे बोगस पीएचडी विकणाऱ्या भामटयांना राजभवनाचे दरवाजे सताड उघडे आहेत. या सर्व माध्यमांतून बोगस पीएचडी वाटणारे या विक्रीला कायदेशीर स्वरूप देत आहेत, हे स्पष्ट दिसून येत आहे.

A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:
► The Open InternationalUniversity of complementary medicine, Sri Lanka

► University of America Hawaii and Inox International University

► Commonwealth Vocational University, Tonga

► University of South, America,

► Southwestern American University

► The American University, USA,

► Zorashtriyan University,

► Sorbonne University, France,

► Mahatma Gandhi Global peace Foundation (NGO)

► Empower Social and Education Trust (NGO).

► Nelson Mandela Nobel Award Academy – NGO

► Diplomatic Mission Global Peace – NGO

► Manav Bharti University (MBU) Himachal Pradesh

► Manav Bharti University, Solan

► Vinayaka Missions Singhania.

► Chhatrapati Shahuji Maharaj University from Kanpur

► American Heritage University of Southern California (AHUSC)

► Peace University

► Dadasaheb Phalke Icon Awards Films – NGO

► Trinity World University, UK

► St. Mother Teresa University

► University of Macaria

► American University of Global Peace

► Jeeva Theological Open University

► World Peace Institute of United Nations

► Global Human Peace University

► Bharat Virtual University for peace and Education

► National global Peace University

► Ballsbridge University

► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)

► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA

► Harshal University

► International Internship University

► British National University of Queen Mary.

► Jordan River University

► Boston Imperial University

► The University of Macaria

► Theophany University

► Dayspring Christan University

► South Western American University

► Global Triumph Virtual University

► Veekramsheela Hindi Vidyapeeth

► Jnana Deepa University (Pune)

संबंधित लेख व घडामोडी

Mumbai Police Accept Fake Dadasaheb Phalke Awards

Shocking Revelation by Sprouts Exclusive By Unmesh Gujarathi Sprouts Exclusive In a shocking development, a notorious fraudster known for selling bogus PhD degrees has managed to distribute fake awards to Mumbai Police officers,...

Dr. Choithram Gidwani: A Pride of the Nation

Dr. Choithram Gidwani: A Pride of the Nation

Thane’s First MP Honored on His 135th Birth Anniversary Unmesh Gujarathi Mumbai A grand event commemorating the 135th birth anniversary of Dr. Choithram Gidwani, Thane district’s first Member of Parliament and a renowned Sindhi freedom fighter, was organized by the...

Advanced Chess Camp Concludes Successfully at Trimbakeshwar

Unmesh Gujarathi Mumbai On behalf of Morphy Chess Academy, Nashik, a residential advanced chess camp was organized under the guidance of Candidate Master and National Gold Medalist, Vinod Bhagwat. The camp took place from December 25 to December 30, 2024, at...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.