डी वाय पाटील महाविद्यालयाला बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे आदेश

लेखक : उन्मेष गुजराथी

9 Aug, 2022

‘स्प्राऊट्स’च्या EXCLUSIVE बातमीची यूजीसीने घेतली दखल

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स इम्पॅक्ट

महाराष्ट्रातील नवी मुंबईत ‘डी. वाय. पाटील’ या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुखपदी महेशकुमार हरित हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे धडे देत आहेत. या हरित यांची १० वी पासून ते डॉक्टर बनण्यापर्यंतची सर्वच प्रमाणपत्रे ही बनावट आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने माहितीचा अधिकार वापरून मिळवली आहेत. या बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेवून त्यासंबंधीच्या बातम्या ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आल्या. तसेच त्यासंबंधी तक्रारीही करण्यात आल्या.

या तक्रारींची दखल युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने (युजीसी) घेतली आहे. यूजीसीने डी वाय पाटील महाविद्यालयाला हरित यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे डी. वाय. पाटील महाविद्यालय चांगलेच अडचणीत आले आहे.

बोगस डॉक्टर हरित याला रजिस्ट्रेशन व नूतनीकरण प्रमाणपत्रे ही Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) या निमसरकारी संस्थेने देवू केलेली आहेत. या संस्थेचे रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी आतापर्यंत शेकडो बोगस डॉक्टरांच्या पदव्यांचे रजिस्ट्रेशन व नूतनीकरण केले आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे. त्यावर आधारित बातम्याही स्प्राऊट्समध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र या महाभ्रष्ट वांगेंवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

एमसीआयएमचा भोंगळ व भ्रष्ट कारभार ‘स्प्राऊट्स’ने कायमच चव्हाट्यावर आणलेला आहे, मात्र या महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचे राजभवनातील अधिकाऱ्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फक्त सत्कार समारंभ करण्याची प्रचंड हौस आहे. आजवर त्यांनी कुलपती या नात्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत.

कोश्यारी यांच्या या उदासीनतेचा फायदा त्यांचे सचिव उल्हास मुणगेकर यांनी घेतला आहे. मुणगेकर हे महाभ्रष्ट असून ते बेकायदेशीररीत्या या पदावर बसलेले आहेत. अशा बेकायदेशीर बसलेल्या सचिवाला कोश्यारी यांचा ‘आशीर्वाद’ आहे. त्यामुळेच दिलीप वांगेसारखे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे अधिकारी १५ वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत आहेत व कोट्यवधी रुपयांची माया गोळा करीत आहेत.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.