जुगारी कंपनीची बॉलिवूडमधील चित्रपटाला स्पॉन्सरशिप

लेखक : उन्मेष गुजराथी

26 Sep, 2022

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

अभिनेता सैफ अली खान व व हृतिक रोशन यांचा विक्रम वेधा ( Vikram Vedha ) हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट अधिकृतपणे ‘द लायन बुक ‘ या कंपनीतर्फे प्रायोजित केला जात आहे. ही कंपनी भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटिंगचा गोरखधंदा चालवत आहे व यातून मिळालेली हजारो कोट्यवधी रुपयांची काळी माया बॉलिवूडमध्ये गुंतवत आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या इन्वेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावयास हवी, अशी स्प्राऊट्सची ठाम भूमिका व मागणीही आहे.

‘बन निडर, दिखा जिगर, खेल इधर’ ( ‘Ban Nidar, Dikha Jigar, Khel Idhar’ ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनमधून प्रेक्षकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त केले जात आहे. द लायन बुक (The Lion Book ) ही बेकायदेशीर कंपनी आहे. या बुकी कंपनीचा मालक हा हितेश खुशलानी ( Hitesh Khushlani )आहे. खुशलानी यांच्यावर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर तो भारतातून दुबईला पळून गेलेला आहे.

खुशलानी यांचा अभिनेता साहिल खान हा भागीदार (द लायन बुकचा सह -संस्थापक) आहे. अशी माहिती साहिल यांनी त्यांच्या Instagram वर असणाऱ्या बायोडेटामध्ये अभिमानाने नमूद केलेली आहे. आजमितीला साहिल खानसह संजय दत्त, सुनील शेट्टी, कपिल शर्मा, उर्वशी  रौतेलUrvashi Rautela यांसारख्या शेकडो नटनट्या या The Lion Book या बेकायदेशीर कंपनीचे सोशल मीडियावरून उघडपणे प्रमोशन करतात. मात्र भारतातील मोदी सरकार, राज्य सरकार व पोलीस प्रशासन यांचे या कंपन्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यामुळे हे सर्व जण मूग गिळून शांत आहेत.

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.