लेखक : उन्मेष गुजराथी
21 Jul, 2023
Unmesh Gujarathi
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वितरण दिवशी चेंगराचेंगरी व अव्यवस्थेमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन पनवेलच्या प्रथमश्रेणी न्यायाधिश सुशीला आर. पाटिल यांनी तक्रारदारांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०० नुसार पुरावा दयावा असे आदेश दिनांक ०७/०७/२०२३ दिलेले आहे .’खारघर’ चौकशीवरून विधानसभा अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले असताना पनवेलच्या न्यायालयाने खारघर दुर्घटनेच्या चौकशी संदर्भात पुरावे सादर करण्याचे दिलेले आदेश चर्चेचा विषय झाला आहे.
खारघर येथे १६ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या शासकीय सोहळ्यात श्री-सदस्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू होण्यासाठी सरकारी यंत्रणाच जबादार आहेत असा आरोप ॲड. असीम सरोदे यांनी पनवेल येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश सुशीला पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी दरम्यान केला. खारघर दुर्घटनेबाबत आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार आप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे यांच्या तर्फे खारघर पोलीस स्टेशन येथे १८ एप्रिल २०२३ रोजी दाखल करण्यात आली होती.
या संदर्भात खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रे देऊन सुद्धा, खारघर पोलिसाकडून काहीच कृती न झाल्याने, आप महाराष्ट्र तर्फे २४ एप्रिल ला नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लेखी स्मरणपत्र दाखल केले. पण त्यानंतरही काहीच कृती न झाल्याने, नाईलाजास्तव पनवेल कोर्टात धाव घ्यावी लागली असे तक्रारदार धनंजय शिंदे म्हणाले. या खाजगी तक्रार अर्जातून मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, खारघर पोलीस ठाणे, परिमंडल – २ पनवेल, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त ह्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दुसरा मुद्दा सरकारने या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावे यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली, होर्डिंग्ज लावले, जाहिराती दिल्या मग मंडप व्यवस्था का केली नाही, पिण्याच्या पाण्याची-जेवणाची व प्रथमोपचाराची सोय का केली नाही?.
तिसरा मुद्दा मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडल वर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लिहिले की हा कार्यक्रम भव्य होणार,अलोट गर्दी जमणार मग लोकांसाठी अन्न, पाणी व प्राथमिक सुविधा का पुरवण्यात आल्या नाहीत?.
जाणूनबुजून दाखविलेला हा बेजबाबदारपणा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे कारण कार्यक्रमासाठी जनतेच्या निधीतून तब्बल 13 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली.
चौथा मुद्दा पोलिसांनी तक्रादर धनंजय शिंदे यांना लेखी कळवले आहे की 14 जणांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
ॲड. असीम सरोदे म्हणाले की काहीही झाले तरीही शवविच्छेदन अहवालात उष्माघाताने मृत्यू असे नमूद केलेच जाऊ शकत नाही, उष्माघाताने मृत्यू झाले असतील तरीही मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज, हृदयक्रिया बंद पडणे, मल्टिपल ऑर्गन फेलिअर असे असू शकते पण सरकारला पाहिजे तसे अहवाल तयार करण्यात आल्याने श्री-भक्तांचे मृत्यू चेंगराचेंगरीत झाले नाहीत तर केवळ उष्माघाताने झालेत असे प्रोजेक्ट करण्यासाठी उष्माघात असा उल्लेख मुद्दाम केला आहे.
शेवटचा पाचवा मुद्दा मांडताना ॲड सरोदे म्हणाले की, धनंजय शिंदे यांनी व्यापक जनहितासाठी ही खाजगी तक्रार कोर्टात केली आहे.
या तक्रारीत सगळे पब्लिक सर्व्हन्ट दोषी आहेत परंतु त्यांनी त्यांच्या ऑफिशियल कामाच्या जबाबदाऱ्या पार न पाडल्याने त्यांच्या विरुद्ध चौकशी आदेश देण्यासाठी न्यायालयाला सरकारच्या पूर्व-परवानगीची गरज नाही तसेच न्यायालयाने सध्या केवळ ‘घटनेच्या चौकशीचे आदेश’ द्यावेत व त्यामुळे पूर्व-परवानगी ची गरज नाही.
धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या तक्रार अर्जातील मुख्य मुद्दे:
देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या ह्या कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे.
हवामान खात्या तर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, ४३ अंश कडक उन्हात लाखो लोकांना ह्या सोहळ्यासाठी बसविण्यात आले. हा सोहळा, केवळ राजकीय फायद्यासाठी, अत्यंत बेजबाबदारपणे, पेंडॉल, प्रथमउपचार आणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी शिवाय आयोजित करण्यात आला.
सरकार तर्फे, मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे पोस्टमॉर्टेम करण्यात सुध्दा हलगर्जी करण्यात आली.
तक्रार अर्जातून करण्यात आल्या मागण्या-
१. या गुन्ह्या संदभात प्रतिसादकानवर तक्रार व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १५६, १५६ (३) व एकत्रित वाचन कलम १९०, कलम २०० नुसार व भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणी इतर गुन्हे दाखल करण्यात यावे.
२. कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, न्यायालयाने सदर दुर्घटना गम्भीरपणे घेऊन, पोलिसांना सखोल चौकशी अहवाल न्यालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत.
३. मृत्युमुखी पडलेल्या १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. १ कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जखमींना रु. १० लाख इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी.
43 डिग्री तापमान असताना उष्माघात चेंगराचेंगरी पाणी न मिळाल्यामुळे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपाशी पोटी राहिल्यामुळे 14 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या पोस्ट मार्टम रिपोर्टची न्यायलायीन चौकशी व्हावी. लोक बसतात तेथे पेंडोल असण्याची गरज होती . प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र उभारण्याची गरज होती परंतु या सर्व बाबींचा विचार न करता लोकांच्या जीवावर बेतेल अश्या कार्यक्रमाचे सरकारने बेजबाबदारपणे आयोजन केले.
या संपूर्ण केस मध्येॲड. असीम सरोदे ॲड व श्रिया आवले यांच्यासह आम महाराष्ट्राची लीगल टीम ॲड. जयसिंग शेरे ॲड. सुवर्णा जोशी यांनी काम बघितले.
विशेष म्हणजे खारघर श्री सेवक मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादीचे जयंत पाटील व विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने हे प्रकरण तापलेले आहे.
संबंधित लेख व घडामोडी
Mumbai Police Accept Fake Dadasaheb Phalke Awards
Shocking Revelation by Sprouts Exclusive By Unmesh Gujarathi Sprouts Exclusive In a shocking development, a notorious fraudster known for selling bogus PhD degrees has managed to distribute fake awards to Mumbai Police officers,...
Dr. Choithram Gidwani: A Pride of the Nation
Thane’s First MP Honored on His 135th Birth Anniversary Unmesh Gujarathi Mumbai A grand event commemorating the 135th birth anniversary of Dr. Choithram Gidwani, Thane district’s first Member of Parliament and a renowned Sindhi freedom fighter, was organized by the...
Advanced Chess Camp Concludes Successfully at Trimbakeshwar
Unmesh Gujarathi Mumbai On behalf of Morphy Chess Academy, Nashik, a residential advanced chess camp was organized under the guidance of Candidate Master and National Gold Medalist, Vinod Bhagwat. The camp took place from December 25 to December 30, 2024, at...