स्टॉक मार्केटचा पुढचा आठवडा (१७ मे २० मे ) पुन्हा थैमान की जीवनदान ?

लेखक केतन जोशी

17 May, 2022

केंद्र सरकारने १३ मे २०२२ रोजी शुक्रवारी रात्री उशिरा एका आदेशाद्वारे गहू निर्यात बंदीचा आदेश काढला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकांच्या गहू उत्पादक देशाने म्हणजे अर्थात भारतने गहू निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्थातच ह्याचे परिणाम जगाच्या गव्हाच्या मागणीवर होणार.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमतीत जगभरात ४०% हुन अधिक वाढ झाली आहे. त्यात ह्या वर्षी भारताला हिटव्हेवचा तडाखा बसला आणि ज्याचा फटका अर्थात गव्हाच्या पिकाला बसला. पंजाब आणि हरियाणातील एकरच्या एकर पिकं ही जळून गेली. गव्हाच्या निर्यातबंदीमुळे देशातील गव्हाच्या मागणीला पुरेसा गहू जरी उपलब्ध होणार असला तरी गव्हाच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.

सध्या तरी हा आदेश लागू होण्याच्या आधी जितके गव्हाच्या निर्यातीचे लेटर ऑफ क्रेडिट इश्यू केले गेले आहेत त्या निर्यातीला परवानगी दिली आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशाने १.४ मिलियन टन गहू निर्यात केला तर मागच्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२१-२२ मध्ये देशाने एकूण ७ मिलियन टन धान्य निर्यात केलं. अशा अचानक निर्यात बंदीच्या निर्णयामुळे भविष्यात भारतीय आयातदारांशी व्यवहार करताना जगभरातील आयातदार विचार करतील आणि त्याचा फटका भारतीय निर्यातदारांना आणि अर्थातच अर्थव्यवस्थेला बसेल.

आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणाऱ्या गव्हाच्या वाहतुकीला फटका बसला आहे ज्यामुळे जगातील अनेक देशांचे डोळे भारताच्या गहू निर्यातीकडे लागले होते त्याला देखील फटका बसला आहे.

संबंधित लेख व घडामोडी

दादासाहेब फाल्के पुरस्कार के नाम पर फलफूल रहा गोरखधंधा

दादासाहेब फाल्के पुरस्कार के नाम पर फलफूल रहा गोरखधंधा

 उन्मेष गुजराथीस्प्राउट्स एक्सक्लूसिव दादासाहेब फाल्के भारतीय सिनेमा के जनक हैं। आज कॉन ऑर्गेनाइजर फाल्के के नाम पर पुरस्कार बेच रहे हैं। ये पुरस्कार आमतौर पर 5,000 रुपये से लेकर 50,000 रुपये तक की राशि में बेचे जाते हैं। इतना ही नहीं, 'स्प्राउट्स' की विशेष जांच...

दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा तेजीत

दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा तेजीत

   उन्मेष गुजराथीsprouts Exclusive भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने सध्या खिरापतीसारखे पुरस्कार वाटले जात आहेत. साधारणतः ५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेवून हे पुरस्कार विकले जातात. इतकेच नव्हे तर फिल्म इंडस्टीशी...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.