लेखक : उन्मेष गुजराथी
2 Jan, 2024
Multi Crore scam by submitting fake affidavits
Unmesh Gujarathi
Sprouts Exclusive
The Sprouts’ Special Investigation Team (SIT) has got sensational information that the education mafia of Thane district submitted false proposals on affidavits by greasing the palms of government institutions, All India Council for Technical Education, Directorate of Technical Education, Charity Commissioner’s Office and Mumbai University and based on that they committed corruption of more than 120 crore rupees.
Sapgaon is a village in Shahapur taluka of Thane district. Alamuri Ratnamala Institute of Engineering and Technology (ARMIET) is a college owned by Koti Vidya Charitable Trust in this village. Courses like Diploma, Degree, Master of Engineering and MMS are conducted in this college.
To run these courses it is mandatory to have the approval of the All India Council of Technical Education (AICTE) in Delhi and the Directorate of Technical Education (DTE) in the state. To get this recognition, the standards (approved handbook) have to be fulfilled. In this, reliable information regarding teacher-student ratio, infrastructure, construction area, classrooms, laboratories, Occupancy Certificate, fire safety certificate, and salary of employees has to be recorded. This handbook has to be updated annually and re-accredited accordingly.
ARMIET College is also affiliated with Mumbai University and Maharashtra State Board of Technical Education (MSBTE). To get this affiliation the university also has to provide reliable information about the college along with necessary documents. However, Koti Charitable Trust also submitted proposals containing false information and fake documents to AICTE, DTE, Mumbai University and Maharashtra State Board of Technical Education.
It is on this basis that approval and affiliation were obtained, not only that, every year the same fraud has been reported to the Sprouts’ Special Investigation Team.
Koti Charitable Trust has given all this false information in the affidavit. What is more shocking is that the top officials of AICTE, DTE and Mumbai University have checked the authenticity of all this information and documents and have also visited the college, inspected and confirmed that everything is legal.
Scam in student fees too
ARMIET is an unaided college owned by Koti Charitable Trust. Therefore, the teachers’ salary has to be paid by the management of the college. Hence, the authority to decide the fees of the college is with the committee of the Fees Regulatory Authority (FRA). A lot of false information and fake audit reports were also submitted to this committee. While submitting this false information, inflated i.e. increased employees and their increased salaries were shown and based on that increased fees were sanctioned.
‘Sprouts’ has also got the information that this college has also charged increased fees in favor of Kalashree Venkatesh Charitable Trust.
Fee proposal and teacher scam
* This trust has submitted fee hike proposals. In this proposal, the list of fake employees has been shown and it has been shown that they have been paid. In this list of employees, relatives, friends, family and many other fake employees are shown.
* In front of the names of these fake employees, the account number of Dombivli Nagari Sahakari Bank and the salary given to them are also mentioned. Also, the names of the employees who have left the job are included in this list.
* Relatives of directors of institutions have been given increased salaries in violation of rules. The team of ‘Sprouts’ has pointed out that the rules have been set on the ground during all this.
By submitting the names of bogus employees to the Fee Regulatory Authority, fees were sanctioned accordingly. Due to this, the fee-category students and the State Government’s Social Welfare Department, Tribal Development Department (ITD) and Minority Department have all been financially cheated.
How the directors did a multi-crore scam?
* Before 2021 to 2022, the fee per student was around Rs 1 lakh. Students are being looted while charging this fee, due to which some employees and organizations have complained. Ramchandra Parashuram Yadav, Aparna Khade, Nikita Rao, and Nilesh Pandit, while MUCTA Teachers Association, Shiv Pratishthan Yuva Hindustan complained and followed up repeatedly. This made the management of the college panic.
* After this complaint and follow-up, an immediate order came and the college management made this fee around 60 thousand rupees.
* So far more than 6000 students have passed in this college. Generally engineering course is of 4 years duration. Therefore, the management has lost about 2 lakh rupees per student. Therefore, the SIT of ‘Sprouts’ has received the information that this scam is more than 120 crore rupees.
FIR filed against institute directors
* Shahapur police station has registered a case of serious crimes against Venkateshwara Gupta and Dr. Lavendra S. Bothra of this trust. The police have registered under sections 34, 409, 465, 467, 468 and 471 of the Indian Penal Code, 1860. registered on Alamuri Venkateshwara Gupta and Dr. Lavendra S. Bothra.
* The management has cheated more than 6000 students and the government on a large scale, however So far, only the tribal department has filed an FIR. It is as clear as sunshine that the rest of the departments are silent because they have received huge money from the management.
Looting government officials
Anil Sahasrabuddhe, the then president of All India Technical Education Council, New Delhi, Ajit Singh, the then Western Division, head of All India Technical Education Council, former director of Directorate of Technical Education (Maharashtra State), Dr. Abhay Wagh and director Dr. Vinod Mohitkar, Maharashtra State Board of Technical Education (Mumbai) Deputy Secretary Santosh Taji, University of Mumbai Vice-Chancellor Ravindra Kulkarni, Pro-Vice-Chancellor Dr. Ajay Bhamre, Vice-Chancellor Sunil Bhirud, Fee Regulatory Authority Chairman Vijay Achalia, Chief Grievance Redressal Pradhan, Jagde, Vijay Narkhede, Awale, Rane are all government officials. For this, the management of the institution has provided financial and other facilities on a large scale.
Ministerial and political interference
* Directors Gupta, Bothra have committed corruption worth crores of rupees one by one. The corruption investigated by Sprouts is only the tip of the iceberg.
* Numerous corruption cases are ‘managed’. Sometimes ‘women’ are also abused to avoid taking action against the management. At times political and ministry officials also intervene on a large scale.
Gupta, Bothra and Arun Bongirwar’s son Piyush Bongirwar have a close relationship. Arun Bongirwar was the Chief Secretary of almost 5 Chief Ministers of Maharashtra. His son Piyush took full advantage of it. Piyush and Gupta, and Bothra have financial relations, that is why if any action is taken against Gupta and Bothra, sources from the ministry immediately intervene, and further action is avoided.
When contacted, Alamuri Venketeshwar Gupta, chairman of the trust, did not respond to the telephone call.
ठाण्यातील शिक्षण माफियाचा १२० कोटी रुपयांचा महाघोटाळा
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
सरकारी संस्था, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय व मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील शिक्षणमाफियाने खोटे प्रस्ताव शपथपत्रांवर सादर केले व त्याआधारे १२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा महाभ्रष्टाचार केला, अशी खळबळजनक माहिती ‘आरटीआय’च्या माध्यमातून ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सापगाव हे गाव आहे. या गावात कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या (Koti Charitable Trust ) मालकीचे अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ARMIET) हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये डिप्लोमा, डिग्री, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग व एमएमएस यांसारखे कोर्सेस घेतले जातात.
हे कोर्सेस चालविण्यासाठी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या केंद्रीय तंत्रशिक्षण परिषदेची तर राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयची (DTE) मान्यता असणे बंधनकारक आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी मानकांची (approved handbook) पूर्तता करावी लागते. यामध्ये शिक्षक- विद्यार्थी प्रमाण, पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्र, वर्ग, प्रयोगशाळा, भोगवटा प्रमाणपत्र (OC Certificate), अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, कर्मचाऱ्यांचे पगार यांसंबंधीची इत्यंभूत माहितीची नोंद करावी लागते. हे हँडबुक प्रतिवर्षी अपडेट करावे लागते व त्याआधारे प्रतिवर्षी पुनर्मान्यता मिळते.
ARMIET या कॉलेजने मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) यांचीही संलग्नता (affiliation) मिळवलेली आहे. ही संलग्नता मिळवण्यासाठी विद्यापीठालाही कॉलेजसंबंधी इत्यंभूत माहिती आवश्यक कागदपत्रांसह पुरवावी लागते. मात्र कोटी चॅरिटेबल ट्रस्टने AICTE, DTE, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळालाही चक्क खोटी माहिती व बनावट डॉक्युमेंट्स असलेले प्रस्ताव सादर केले.
याआधारेच मान्यता व संलग्नता मिळवली, इतकेच नव्हे तर दरवर्षी अशाच प्रकारे खोटी माहिती व ऑडिट सादर केले. त्यातूनच विद्यार्थी व सरकारची फसवणूक केल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमकडे आलेली आहे.
कोटी चॅरिटेबल ट्रस्टने ही सारी खोटी माहिती शपथपत्रावर (affidavit ) दिलेली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे AICTE, DTE व मुंबई विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांनी ही सर्व माहिती व कागदपत्रांची सत्यता तपासली व प्रत्यक्ष कॉलेजला भेटही दिली, तपासणी केली व सर्व काही कायदेशीर असल्याचा खोटा निर्वाळाही दिलेला आहे.
विद्यार्थ्यांच्या शुल्कातही (fees) महाघोटाळा
कोटी चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचे ARMIET हे कॉलेज विनाअनुदानित आहे. त्यामुळे शिक्षकांचा पगार हा कॉलेजच्या व्यवस्थापनाला करावा लागतो, त्यामुळे या कॉलेजचे शुल्क ठरविण्याचा अधिकार हा शुल्क नियामक प्राधिकरण (Fees Regularitory Authority) या समितीकडे आहे. या समितीलाही चक्क खोटी माहिती व बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आले. ही खोटी माहिती सादर करताना फुगवटा म्हणजेच वाढीव कर्मचारी व त्यांचे वाढीव पगार दाखविण्यात आले व त्याआधारेच वाढीव शुल्क मंजूर करून घेतले.
तसेच या कॉलेजने ‘कलाश्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट’च्या नावेसुद्धा वाढीव शुल्क घेतल्याचे निदर्शनास आल्याची माहितीही ‘स्प्राऊट्स’ला मिळालेली आहे.
शुल्क प्रस्ताव व शिक्षक घोटाळा
* या ट्रस्टने शुल्क वाढीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. या प्रस्तावात बनावट कर्मचाऱ्यांची यादी दाखवून त्यांना वेतन दिल्याचे दाखविण्यात आलेले आहे. या कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये संस्थाचालकांचे नातेवाईक, मित्र परिवार व इतर अनेक बनावट कर्मचारी दाखविण्यात आलेले आहेत.
* संस्थाचालकांच्या नातेवाईकांना नियमांचे उल्लंघन करत वाढीव वेतन देण्यात आलेले आहे. हे सर्व करताना नियम धाब्यावर बसविण्यात आलेले असल्याचे ‘स्प्राऊट्स’च्या टीमला निदर्शनास आलेले आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाला बोगस कर्मचाऱ्यांची नावे सादर करून, त्याआधारे शुल्क मंजूर करून घेतले. त्यामुळे शुल्क प्रवर्गातील विद्यार्थी व राज्य सरकारच्या समाजकल्याण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अल्पसंख्याक विभाग या सर्वांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
असा केला महाघोटाळा?
* सन २०२१ ते २०२२ च्या आधी एका विद्यार्थ्याचे शुल्क जवळपास १ लाख रुपयांच्या आसपास होते. हे शुल्क घेताना विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे, यामुळे काही कर्मचारी व संघटना यांनी तक्रारी केल्या. रामचंद्र परशुराम यादव, अपर्णा खाडे, निकिता राव, निलेश पंडित यांनी तर ‘मुक्ता शिक्षक संघटना’, ‘शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ या संघटनांनी तक्रारी केल्या, वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे कॉलेजच्या व्यवस्थापनाचे धाबे दणाणले.
* या तक्रारी व पाठपुराव्यानंतर तात्काळ आदेश आला व कॉलेजच्या व्यवस्थापनाने हे शुल्क ६० हजार रुपयांच्या आसपास केले.
* आतापर्यंत या कॉलेजमध्ये ६००० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. साधारणतः इंजिनीअरिंगचा कोर्स हा ४ वर्षांचा असतो. त्यामुळे प्रतिविद्यार्थी सुमारे २ लाख रुपये व्यवस्थापनाने लाटले आहेत. त्यामुळे हा घोटाळा १२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा झालेला आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला मिळालेली आहे.
संस्थाचालकांवर एफआयआर दाखल
* या ट्रस्टचे संस्थाचालक अलमुरी वेंकटेश्वर गुप्ता (Alamuri Venkateshwar Gupta) आणि डॉ. लवेंद्र बोथरा (Dr.Lavendra S. Bothra) यांच्या विरोधात शहापूर पोलीस स्टेशन येथे ३४, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
* संस्थाचालकांनी विद्यार्थी व सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे, मात्र आतापर्यंत फक्त आदिवासी विभागाने एफआयआर केलेला आहे. बाकी इतर विभाग व्यवस्थापनाकडून पैसे मिळाल्यामुळे मूग गिळून गप्प आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
लुटारू सरकारी अधिकारी मोकाट
या महाभ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे तत्कालीन पश्चिम विभाग प्रमुख अजित सिंग, तंत्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र राज्य) माजी संचालक डॉ. अभय वाघ व सध्याचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (मुंबई) उपसचिव संतोष ताजी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, नियमबाह्य पद्धतीने नेमणूक झालेले प्र.कुलगुरू अजय भामरे, प्र-कुलसचिव सुनील भिरुड, शुल्क नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष विजय अचलिया, तक्रार निवारण प्रमुख प्रधान, जागडे, विजय नारखेडे, आवळे, राणे या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले आहे. त्यासाठी संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व इतर सोयी पुरविलेल्या आहेत.
मंत्रालयीन व राजकीय हस्तक्षेप
* संस्थाचालक बोथरा यांनी एकाहून एक असे कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेले आहेत. ‘स्प्राऊट्स’ने इन्व्हेस्टीगेशन केलेला भ्रष्टाचार हा हिमनगाचे एक टोक आहे.
* असंख्य भ्रष्टाचाराची प्रकरणे ‘मॅनेज’ केली जातात. संस्थाचालकांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रसंगी महिलांचाही गैरवापर होतो. प्रसंगी राजकीय व मंत्रालयातील अधिकारीही मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करतात.
संस्थाचालक बोथरा, गुप्ता व अरुण बोंगीरवार यांचा मुलगा पियुष बोंगीरवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अरुण बोंगीरवार हे जवळपास महाराष्ट्रातील ५ मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते. त्याचा पुरेपूर फायदा त्यांचा मुलगा पियुष याने घेतला. पियुष व गुप्ता, बोथरा यांचे आर्थिक संबंध आहेत, त्यामुळेच गुप्ता, बोथरा यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास त्वरित मंत्रालयातून सूत्रे हालतात, हस्तक्षेप होतो व पुढील कारवाई टळते.
संबंधित लेख व घडामोडी
पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित
उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स Exclusive पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा दावा एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...
Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case
Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...
Ban on MDH, Everest masala | India seeks details from food regulators of Singapore, Hong Kong
Unmesh GujarathiSprouts Exclusive India, the world's largest producer, consumer and exporter of spices, has sought details from food safety regulators of Singapore and Hong Kong, which has banned certain spices of Indian brands MDH and Everest due to quality...
अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी
आमची समाजमाध्यमं
Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque