एअर इंडियाच्या महाराजाला अखेर मिळाला बॉस

लेखक केतन जोशी

17 May, 2022

कॅम्पबेल विल्सन हे एअर इंडियाचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ असणार आहेत. कॅम्पबेल हे सिंगापूर एअरलाईन्सच्या स्कुट एअरचे सीईओ होते. सिंगापूर एअरलाईन आणि टाटा समूह ह्यांचं जॉईंट व्हेंचर म्हणजे विस्तारा एअरवेज. थोडक्यात टाटा समूहाच्या कार्यशैलीबद्दल माहिती असणारा आणि एअरलाईन बिझनेस बद्दल सखोल माहिती असणारा माणूस हा एअर इंडियाला उंच आकाशात उडण्यास मदत करणार आहे.

एअर इंडिया ही अनेक दशकं ही सरकारी कंपनी होती त्यामुळे सरकारी खाक्या हा तिच्या कणाकणात भिनला आहे अशा कंपनीला त्या वातावरणातून बाहेर काढून तिला जागतिक स्पर्धेत उतरवणं हे खूप मोठं चॅलेंज कॅम्पबेल विल्सन ह्यांच्या समोर आहे.

२७ जानेवारी २०२२ रोजी टाटांनी एअर इंडियाची मालकी विकत घेतल्याची घोषणा केली. कुठल्याही कंपनीकडे जगभरातले फायद्याचे एअर रूट्स असणं फार महत्वाचं असतं त्या बाबतीत एअर इंडिया ही अत्यंत प्रभावी कंपनी आहे. जगातल्या अनेक महत्वाच्या शहरांच्या दिशेने एअर इंडियाची विमानं झेपावतात. त्या ठिकाणी एअर इंडियाची जमेची बाजू आहे पण त्याच वेळेस जुनी झालेली विमानं, जुन्या मानसिकतेत अडकलेला स्टाफ आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कर्जाचा डोंगर ह्या कात्रीत एअर इंडिया अडकली आहे. एअर इंडिया नफ्यात येणं हे देशाच्या एकूणच हवाई वाहतूक क्षेत्रासाठी गरजेचं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी कॅम्पबेल विल्सन ह्यांना ‘मनीन्यूज१’ च्या शुभेच्छा !

संबंधित लेख व घडामोडी

दादासाहेब फाल्के पुरस्कार के नाम पर फलफूल रहा गोरखधंधा

दादासाहेब फाल्के पुरस्कार के नाम पर फलफूल रहा गोरखधंधा

 उन्मेष गुजराथीस्प्राउट्स एक्सक्लूसिव दादासाहेब फाल्के भारतीय सिनेमा के जनक हैं। आज कॉन ऑर्गेनाइजर फाल्के के नाम पर पुरस्कार बेच रहे हैं। ये पुरस्कार आमतौर पर 5,000 रुपये से लेकर 50,000 रुपये तक की राशि में बेचे जाते हैं। इतना ही नहीं, 'स्प्राउट्स' की विशेष जांच...

दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा तेजीत

दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने गोरखधंदा तेजीत

   उन्मेष गुजराथीsprouts Exclusive भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने सध्या खिरापतीसारखे पुरस्कार वाटले जात आहेत. साधारणतः ५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेवून हे पुरस्कार विकले जातात. इतकेच नव्हे तर फिल्म इंडस्टीशी...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.