पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या उपस्थितीत पुन्हा बोगस पीएचडी वाटप

लेखक : उन्मेष गुजराथी

30 Jul, 2022

बोगस पदव्या विकून पीएचडी वाटपाचा गोरखधंदा जोरात 
कुलपती भगत सिंह कोश्यारी मूग गिळून गप्प 
 
उन्मेष गुजराथी 
स्प्राऊट्स EXCLUSIVE 
 
 
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी विकून गंडा’ घातल्याची धक्कादायक माहिती पुराव्यासह ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीच्या हाती लागली होती. याविषयीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट १० एप्रिल रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकामध्ये फोटोसह प्रसिद्ध करण्यात आला. ( Prime Minister Narendra Modi’s brother too duped with bogus PhD) या रिपोर्टने सर्वत्र खळबळ माजली. 
 
मात्र त्यानंतरही पुन्हा प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत बोगस ऑनररी पीएचडीचे वाटप केले. वास्तविक कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला पीएचडी वाटप करण्याचा अधिकार नाही. तरीही हे वाटप खुलेआम करण्यात येते. बहुतांशी एनजीओ स्वतःच विद्यापीठांसारख्या बनून पीएचडी विकतात. तर काही संस्था भारतातील बोगस विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने या बोगस पीएचडी पदव्या विकतात.
 
सरकारच्या नियमानुसार विद्यापीठ सुरु करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची (युजीसी ) मान्यता लागते. काही बिलंदर महाभाग असे आहेत की ते परदेशातील बोगस विद्यापीठांशी टाय अप करतात.
 
जर परदेशी विद्यापीठाला भारतात येऊन पीएचडी द्यायची असेल तर युजीसीची मान्यता असलेल्या विद्यापीठाची संलग्नता घ्यावी लागते. जर एखाद्या परदेशी विद्यापीठाला त्यांच्या देशात पीएचडी वाटप करायचे असेल तर त्यांनाही त्या देशातील युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
 
ऑनररी पीएचडीचे वाटप करताना सर्व नियम झुगारून ‘ताज’ सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बेधडक ऑनररी बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम साजरे केले जातात. बोगस पीएचडी वाटप करणाऱ्या संस्था, विद्यापीठे यांची यूजीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे बेकायदेशीरपणे बसलेले स्वीय सचिव उल्हास मुणगेकर यांच्याशी ‘आर्थिक संबंध’ असतात. त्यामुळेच हे सर्व मूग गिळून गप्प बसतात.
 
वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्या संस्थांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.
  • ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
  • अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
  • कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
  • युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
  • अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
  • झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
  • सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
  • महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन – (NGO)
  • एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट – (NGO)
  • नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी – NGO
  • डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस – NGO
  • मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
  • मानव भारती विद्यापीठ, सोलन
  • विनायक मिशन्स, सिंघानिया.
  • अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
  • छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
  • अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
  • पीस युनिव्हर्सिटी
  • ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके
  • सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी
  • अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल युनिव्हर्सिटी
  • जीवा थिऑलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी
  • वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड नेशन्स
  • ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी
  • भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन
  • नॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी
  • बल्सब्रिज युनिव्हर्सिटी
  • श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन (एनजीओ )

संबंधित लेख व घडामोडी

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

   उन्मेष गुजराथी  स्प्राऊट्स Exclusive    पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित  करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा  दावा  एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

 Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...

अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी

आमची समाजमाध्यमं

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque

मनी कंट्रोल न्यूज पोर्टल © २०२२. सर्व हक्क आरक्षित.