लेखक : उन्मेष गुजराथी
18 Nov, 2023
फेक ऑनररी पीएचडी वाटप घोटाळा
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive:
कोणत्याही देशाची मान्यता नसलेले विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांनी पीएचडीचा मांडलेला बाजार ‘स्प्राऊट्स’ने सातत्याने उघडकीस आणला. जनजागृती झाली, तसा धंदा मंदावला. पण झटपट पैशाची चटक लागलेले महाठग थोडेच सुधारणार? त्यांनी आता जुनी दारू नव्या बाटलीत विकण्याचा धंदा सुरु केला आहे.
पीएचडी वितरणाचा कार्यक्रम बिनबोभाट करता येत नाही, म्हणून पुरस्कार सोहळ्याचा गोंडस थाट मांडला जात आहे. अर्थात हे पुरस्कार कसे मिळवतात, हे वेगळे सांगायला नको, असो. आणि आज याच पुरस्कार सोहळ्यात १० ते १५ जणांचे पदवीदानही उरकून घेतले जाते. म्हणायला पुरस्कार सोहळा, त्यासाठी फार परवानग्या काढायची गरज नाही. आणि मधूनच पदवी,अशी ही डबल कमाईची टूम सध्या नव्याने फोफावत आहे.
‘स्प्राऊट्स’ने सातत्याने आवाज उठवल्याने अनेक बड्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमात पाहुणे म्हणून येण्याचे बंद केले. अर्थातच कार्यक्रमाचे ग्लॅमर कमी झाले. ते पुन्हा कमविण्यासाठी हा नवा मार्ग भामट्या आयोजकांनी शोधून काढलेला आहे. येणारे पाहुणेही पुरस्कार समारंभासाठी येतात. महाराष्ट्र सदन, पत्रकार भवन अशा नावाजलेल्या ठिकाणी सोहळे होतात. दुर्दैव म्हणजे कुणीच खात्री करून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.
झोपेचे सोंग घेतलेले आयोगाचे भ्रष्ट अधिकारी:
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बोगस मानद पीएचडी विकण्याचा धंदा तेजीत चालला आहे. हे पीएचडी वाटप करण्याचे कार्यक्रम जवळपास दररोज होत आहेत. यातील बहुतांशी कार्यक्रम हे पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात होतात. याविषयीच्या तक्रारी ‘स्प्राऊट्स’ने ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’कडे (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) वारंवार केलेल्या आहेत. मात्र इतके होऊनसुद्धा आयोगा’चे वरीष्ठ अधिकारी ‘हप्ते’ खाऊन झोपेचे सोंग घेत आहे, अशी खळबळजनक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (SIT) हाती आलेली आहे.
भारतात सध्या पुरस्कार म्हणजेच पुरस्कार वाटण्याचे (Award Distribution) कार्यक्रम सर्रास होत असतात. यातील काही अपवाद वगळता सर्वच कार्यक्रम हे ‘पेड’ असतात. अवार्ड घेणाऱ्याकडून कार्यक्रमाच्या खर्चासाठी दामदुपटीने पैसे घेतले जातात. याशिवाय प्रसारमाध्यमांतून त्या व्यक्तीची प्रसिद्धी करायची झाल्यास वेगळे पैसे आकारले जातात.
अशा कार्यक्रमातच बोगस पीएचडी पदवीचे ‘गिऱ्हाईक’ हेरले जाते व त्याच्याकडून अक्षरश: लाखो रुपये उकळले जातात. या कार्यक्रमात तर गृहमंत्री, शिक्षण मंत्री इतकेच नव्हे तर निवृत्त न्यायाधिशांनाही आणण्याचे लेखी प्रॉमिस केले जाते, प्रत्यक्षात यापैकी कोणीही येत नाही. येतात त्या फक्त ‘सी’ ग्रेडच्या फटाकड्या नट्या व लो प्रोफाइल राजकीय नेते.
अभिषेक पांडे (Abhishek Pandey) हा असाच एक भामटा (fraudster). सध्या हा भामटा Maryland State University, The University of Macaria, Theophany University हे तीन बोगस विद्यापीठ चालवतो. याचा भांडाफोड ‘स्प्राऊट्स’ने याआधी केलेला होता. त्यामुळे या भामट्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला.
सध्या पांडे याने स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी पुरस्कार- अवार्ड वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी केवळ मंत्रीसंत्री नव्हे तर दस्तरखुद्द काँगेसचे नेते राहुल गांधी येणार आहेत, अशी सोशल मीडियावरून जाहिरातही या भामट्याने केलेली आहे. या जाहिरातीतून पांडे हा लोकांची दिशाभूल करतो व त्यांच्याकडून दामदुपटीने पैसे गोळा करतो, हे दिसून येते.
पांडे हा या तीन बोगस विद्यापीठांचा मास्टरमाइंड आहे. वास्तविक या विद्यापीठांना भारतासह कोणत्याही देशात कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे केवळ नकली सर्टिफिकेट छापून हा उमेदवारांकडून लाखो रुपये उकळतो, याच पद्धतीने या भामट्याने शेकडो उमेदवारांकडून अक्षरश: कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे, या सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही स्प्राऊट्सच्या वतीने संबंधित विभागाकडे केली जाणार आहे.
पुण्याच्या पत्रकारांनाही गंडवलं
मागील वर्षी चक्क मुंबईतील राजभवनात बोगस पीएचडी पदव्या (honorary doctorate- honoris causa) वाटण्याचा कार्यक्रम थाटामाटात साजरा झाला. या कार्यक्रमाला राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेल्या उल्हास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याची साथ होती. याचा भांडाफोडही ‘स्प्राऊट्स’ या इंग्रजी दैनिकाने त्यावेळी केला होता, मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातले. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. आजही हाच मुणगेकर राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेला आहे व राजभवनात बसून आर्थिक घोटाळे करीत आहे.
पुण्यातील पत्रकारांनाही गंडवलं!
अगदी असाच एक कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. वास्तविक पुणे हे तर विद्येचे माहेरघर. मात्र या विद्यानगरीतही बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम झाला. तोही नाना पेठमधील पत्रकार भवनातच. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ, असे या कथित vartual विद्यापीठाचे नाव आहे.
हे विद्यापीठ अमरावतीत असल्याचा दावा केला जातो. वास्तविक अशा virtual विद्यापीठांना भारतात मान्यता नाही. त्यामुळे त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचा अर्थ हे कथित विद्यापीठ सपशेल बोगस आहे, तरीही लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे, व अशी बोगस विद्यापीठे नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहे, त्यातही हा कार्यक्रम पत्रकार भवनात व्हावा व पत्रकारांनी मूग गिळून गप्प राहावे, यापेक्षा दुर्दैव ते काय?
या कार्यक्रमामध्ये अलिबाग येथील पत्रकार जयपाल पाटील (Jaypal Patil) यांसारख्या पत्रकारांना बोगस पीएचडी पदव्या दिल्या. या पदवी प्रमाणपत्रावर प्रकाश घवघवे (Prakash Ghavghave), मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh ) व नरेशचंद्र काठोले (Nareshchandra Kathole ) या भामट्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तिघांच्या टोळीनेही आजवर अनेकांना बोगस पीएचडी पदव्या वाटलेल्या आहेत.
भुरटे पत्रकारही आघाडीवर
महेंद्र देशपांडे (Mahendra Deshpande, नाशिक) व विश्वास आरोटे (Vishwasrao Arote, Akole) या दोन पत्रकारांनीही आता बोगस पीएचडी घेतलेली आहेत. सध्या हे दोघे पुरस्कार वाटण्याच्या नावाखाली चक्क बोगस पीएचडी पदवी वाटतात, असे स्प्राऊट्सच्या निदर्शनास आलेले आहे.
वाचकांना आवाहन
बोगस पीएचडी वाटप करणाऱ्यांचा ‘स्प्राऊट्स’ मागावर आहे. यासंबंधीचे अनेक गैरव्यवहार ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने (SIT ) उघडकीस आणलेले आहे. आपल्याला शक्य झाल्यास ही स्पेशल स्टोरी सर्वत्र व्हायरल करा, यूजीसीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारा व जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. अधिक माहिती मिळाल्यास ९३२२७५५०९८ या मोबाईलवर व्हॉट्सअॅप करा.
Buy one, get one free!
Take an award, get a PhD!
Fake honorary Ph.D. distribution scamSprouts Exposes Shocking Scandal:Fake PhDs Sold in High-Stakes Degree Market
Unmesh Gujarathi
Sprouts Exclusive
In a bombshell revelation, investigative news outlet ‘Sprouts’ has lifted the veil on a massive scandal involving the sale of counterfeit PhDs. The prestigious educational institution, once lauded for its exclusive programs, now stands accused of orchestrating a fraudulent scheme that has sent shockwaves through academic circles.
‘Sprouts’ investigative team delved into the underbelly of the institution’s operations, uncovering a clandestine market where PhDs were allegedly sold like commodities. The expose alleges that the institution, which lacked international recognition, had been capitalizing on the desperation of individuals seeking academic recognition.
The heart of the scandal revolves around a supposed award distribution ceremony, touted as a grand affair. However, ‘Sprouts’ claims that behind the glitz and glamour lies a sinister operation – the sale of fake PhDs under the guise of academic honors.
The news report suggests that unsuspecting individuals, lured by the promise of prestige, were instead duped into purchasing these bogus qualifications. The ceremony, once anticipated as a milestone event, now appears to be a smokescreen for a nefarious operation that has left many questioning the credibility of academic honors.
As the exposé gains traction, ‘Sprouts’ is demanding answers. The investigation points fingers at influential figures associated with the institution, leaving a trail of questions about the integrity of the entire academic system.
This scandal, brought to light by ‘Sprouts,’ is not merely an indictment of one institution but a wake-up call for the entire academic community. The news outlet is urging authorities to conduct a thorough investigation into the matter, emphasizing the need for accountability and transparency in the prestigious world of academic recognition.
The revelation by ‘Sprouts’ serves as a stark reminder that not all that glitters in academia is gold, urging a reevaluation of the systems in place to safeguard the sanctity of academic achievements.
The business of selling bogus honorary PhDs is booming not only in Maharashtra but all over India. These PhD-awarding programs are happening almost every day. Most of these events take place at award shows. Complaints about this have been repeatedly made by Sprouts to the University Grants Commission (UGC). But despite all this, sensational information has come to the hands of Sprouts’ Special Investigation Team (SIT) that senior officers of the Commission are pretending to be sleeping by taking money from the bogus university owners.
Presently, award distribution programs are happening in India. All these programs are ‘paid’ with few exceptions. The awardee is charged heavily as much for the program expenses. Apart from this, if the person is to be publicized through the media, a separate fee is charged.
It is in such a program that the ‘buyer’ of the bogus Ph.D. degree is spied on and literally extorted lakhs of rupees from him. In this program, there is a written promise to bring not only the Home Minister, and Education Minister but also retired judges, but in reality, none of them come. Only ‘C’ grade actresses and low-profile political leaders come.
Abhishek Pandey is one such fraudster. Currently, he runs three bogus universities namely Maryland State University, The University of Macaria, and Theophany University. It was previously exposed by ‘Sprouts’. Therefore, the real face of this con man came before the public.
Presently, Pandey has organized an award distribution program to improve his image. This fraudster has also advertised on social media that not only ministers but Congress leader Rahul Gandhi are also invited to this event. Further, he has claimed that the former Chief Minister of Uttarakhand Tirat Singh Rawat has confirmed his presence at this award show.
He has also invited many other high-ranking officials to his award show. It shall be notable to observe that all these high-profile people will be attending the event to accept awards from such fraudsters and help them to further cheat people. Sprouts and its SIT shall be writing to all officials, ministers and bureaucrats about Abhishek Pandey and his motive.
Pandey is the mastermind of these three bogus universities. Actually, these universities have no legal recognition in any country including India. Therefore, only by printing fake certificates, he extorts lakhs of rupees from the candidates, in the same way, this scammer has literally collected crores of rupees from hundreds of candidates, a demand will be made on behalf of Sprouts to the concerned department to investigate all these malpractices.
Bogus PhD degrees were also distributed in the Journalist Bhavan
Last year, the program of awarding bogus PhD degrees (honorary doctorate-honoris causa) was celebrated with great pomp in the Raj Bhavan in Mumbai. This program was accompanied by Ulhas Mungekar, a corrupt officer who was illegally sitting in the Raj Bhavan.
This was also exposed by the ‘Sprouts’ at that time, but the then Governor Bhagat Singh Koshyari supported this corrupt officer. Therefore, this incident has not been thoroughly investigated. Even today the same Mungekar is illegally sitting in the Raj Bhavan and doing financial scams.
A similar kind of event took place in Pune, Maharashtra. Actually, Pune is known as the “Oxford of the East”. However, there was a program to distribute bogus PhDs. That too in the journalists building (Patrkar Bhavan) in Nana Peth. The name of this alleged virtual university is Chhatrapati Shivaji Maharaj Lok Vidyapeeth.
This university is claimed to be in Amravati. Actually, such virtual universities are not recognized in India. So there is no question of getting it approved by the University Grants Commission (UGC). This means that this alleged university is completely bogus, yet people’s ignorance is being taken advantage of, and such bogus universities are being run in an illegal manner, what is more unfortunate than that this program should be held in a journalists’ building and the journalists should swallow peanuts and keep silent?
In this program, bogus PhD degrees were given to journalists like Jaypal Patil (Alibaug) and others. This degree certificate has the signatures of Prakash Ghavghave, Mangesh Deshmukh and Nareshchandra Kathole. Even the gang of these three have distributed bogus PhD degrees to many people till now.
journalists are also at the forefront of selling bogus PhD degrees
Mahendra Deshpande (Nashik) and Vishwas (Vishwasrao) Arote – Akole two journalists have also got bogus PhDs. Sprouts has pointed out that at present these two seem to be bogus PhD degrees in the name of award distribution.
Appeal to readers
‘Sprouts’ SIT is on the trail of the bogus Ph.D. scam. Many malpractices in this regard have been exposed by the Sprouts’ SIT. It’s a request to readers to viral the Sprouts’ special story. call the corrupt officials in UGC to account and try to create awareness among the public. If you have such kind of information, please feel free to WhatsApp on 9322755098.
A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:
► Maryland State University
► The University of Macaria
► Theophany University
► The Open International University of Complementary Medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zoroastrian University,
► Mahatma Gandhi Global Peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO)
► Nelson Mandela Nobel Award Academy (NGO)
► Diplomatic Mission Global Peace (NGO)
► Vinayaka Missions Singhania.
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Global Human Rights Trust (GHRT)
► Dadasaheb Phalke Icon Awards Films: NGO
► World Human Protection Commission- NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for Peace and Education
► National Global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
► Central Christian University
► Azteca University
► University of Swahili
► Chhatrapati Shivaji Maharaj Lok Vidyapith, Amravati
► International Human Rights Ambassador International Peace Corps Association
► Indo Global University, Hyderabad
► Mount Elbert Central Unversity
► American East Coast University
► Institute of Entrepreneurship and Management Studies, IEMS
► McSTEM Eduversity, USA
► Social Awareness and Peace University
► Indian School of Management and Studies
► Socrates Social Research University
► International Global Peace University
► Ballsbridge University
► Commonwealth of Dominica
► International Anti-corruption and Human Rights Council
► Bharat Virtual University
► Anna University
संबंधित लेख व घडामोडी
पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित
उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स Exclusive पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा दावा एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...
Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case
Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...
Ban on MDH, Everest masala | India seeks details from food regulators of Singapore, Hong Kong
Unmesh GujarathiSprouts Exclusive India, the world's largest producer, consumer and exporter of spices, has sought details from food safety regulators of Singapore and Hong Kong, which has banned certain spices of Indian brands MDH and Everest due to quality...