लेखक : उन्मेष गुजराथी
24 Jun, 2023
छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनाही बोगस पीएचडी देवून गंडवले
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
मात्र ही मानद पीएचडी बोगस आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने मिळवली आहे.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना पॅरिसमधील Sorbonne University ने मानद पीएचडी दिली, असा दावा करण्यात आला. तशी जोरदार जाहिराबाजीही मुख्यमंत्री बघेल व त्यांच्या समर्थकांनी केली. इतकेच नव्हे तर तसे सरकारी पत्रकही कार्यक्रमाच्या फोटोसह प्रसिद्ध करण्यात आले.
एरवी विश्वासार्हतेच्या नावाने टिमकी वाजवणाऱ्या सर्वच प्रसारमाध्यमांनी ही बातमी फोटोसह कव्हर केली. प्रत्यक्षात ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने खरीखुरी पण ऑथेंटिक माहिती पुराव्यासह मिळवली आहे.
Read this also : Former mayor of Mumbai caught with Bogus Ph.D Flesch reading ease
फ्रान्सच्या राजधानीतील पॅरिसमध्ये Sorbonne University कार्यरत आहे. हे विद्यापीठ फार जुने व नावाजलेले आहे. ही युनिव्हर्सिटी खिरापतीसारखी मानद पीएचडी देत नाही. इतकेच नव्हे तर मानद पीएचडी द्यायची वेळ आली, तर तशा प्रतिष्ठित व्यक्तींनाच देण्यात येते.
इतकेच नव्हे तर ही पदवी देण्याचा कार्यक्रम हा पॅरिसमधील या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच दिला जातो. बाकी इतर कोणत्याही ठिकाणी नाही.
डॉ. विवेक (Dr. Vivek) हा मधू क्रिशन (Madhu Krishan), पियुष पंडित (Peeyush Pandit ), कल्याणजी जाना (Kalyanji Jana), कुमार राजेश (Kumar Rajesh) यांच्यासाखाच भामटा. लोकांना बोगस पीएचडी देवून गंडविणे, हा या विवेकसह सर्वांचाच मुख्य गोरखधंदा.
या गोरखधंद्यातून या भामट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे.
विवेकने Robert De Sorbon या फ्रान्समधील (France) धार्मिक विचारवंतांच्या नावाने वेबसाईट बनवली. ही बेबसाइट शाळेसाठी बनविण्यात आली. या शाळेचा लूक हा फ्रान्समधील वेबसाईट्सला मिळताजुळता असा ठेवण्यात आला. या शाळेचे नाव ठेवले Ecole Superieure Robert De Sorbon.
ही शाळा फक्त वेबसाईटवरच दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या शाळेसाठी कुठल्याही सरकारची परवानगी घेण्यात आलेली नाही, म्हणजेच ही शाळा संपूर्णतः बोगस आहे.
विवेकने फ्रान्समधील धर्मशास्त्रज्ञ रॉबर्ट डी सॉर्बन (Theologian Robert De Sorbon) यांच्या नावाने एक शाळा आणि www.sorbon.fr या नावाने वेबसाइट तयार केलेली आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या सोर्बोन विद्यापीठाची ओळख निर्माण होईल.
ही वेबसाइट कामाच्या अनुभवावर आधारित पदवी प्रदान करणाऱ्या शाळेसाठी तयार केल्याचा दावा करते (आव आणते). या शाळेच्या वेबसाइटचे स्वरूप फ्रान्समधील वेबसाइटसारखेच आहे.
शाळेचे नाव Ecole Superieure Robert De Sorbon होते. ही शाळा फक्त वेबसाईटवर दाखवली जात आहे. वास्तविक या शाळेला जगातील कोणत्याही देशातील सरकारने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही, म्हणजे ही शाळाही पूर्णपणे बोगस आहे.
या वेबसाइटवर केवळ कामाच्या अनुभवानुसार पदवीचा उल्लेख आहे. विवेक हे फ्रेंच सरकारने फ्रान्समध्ये नोंदणीकृत केलेल्या विद्यापीठांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. सोर्बोन हे theological नाव हे सोर्बोन विद्यापीठ असल्याचा ठसा उमटवण्यासाठी वापरला जातो.
त्यांनी दिलेली पदवी वास्तविक आणि मूळ सोरबोन विद्यापीठाची नसून या शाळेची आहे, अर्थात सपशेल बोगस आहे. या विवेकने आजतागायत शेकडो लोकांची अशा प्रकारे बोगस मानद पीएचडी देवून फसवणूक केलेली आहे, अशी माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
या शाळेसाठी पॅरिसमधला पत्ता वापरण्यात आला आहे. मात्र स्पेशल स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने (Sprouts Special Investigation Team) याची खातरजमा केली असता हा पत्ता पॅरिसमधील स्थानिक गॅरेजचा देण्यात आलेला आहे, असे आढळून आले आहे.
इतके सर्व होऊनसुद्धा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन University Grants Commission (UGC) या बोगस मानद पीएचडीवाल्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासून आहे.त्यामुळे भारतात हा गोरखधंदा फळफळलेला आहे.
A list of fake universities awarding bogus Ph.D. degrees has been given here for the information of our valuable readers:
► The Open International
University of complementary medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► Commonwealth Vocational University, Tonga
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zorashtriyan University,
► Sorbonne University, France,
► Mahatma Gandhi Global peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO).
► Nelson Mandela Nobel Award Academy – NGO
► Diplomatic Mission Global Peace – NGO
► Manav Bharti University (MBU) Himachal Pradesh
► Manav Bharti University, Solan
► Vinayaka Missions Singhania.
► Chhatrapati Shahuji Maharaj University from Kanpur
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Dadasaheb Phalke Icon Awards Films – NGO
► Trinity World University, UK
► St. Mother Teresa University
► University of Macaria
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for peace and Education
► National global Peace University
► Ballsbridge University
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation (NGO)
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary.
► Jordan River University
► Boston Imperial University
► The University of Macaria
► Theophany University
► Dayspring Christan University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Veekramsheela Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
संबंधित लेख व घडामोडी
पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित
उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स Exclusive पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली 'अजय-अतुल लाईव्ह' कॉन्सर्ट स्थगित करण्यात आली असून 'आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे' असा दावा एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी...
Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case
Unmesh GujarathiSprouts Exclusive Mumbai: The Mumbai Police has arrested actor Sahil Khan for his alleged involvement in the Mahadev betting app case. Sahil Khan was arrested in Chhattisgarh by the Special Investigating Team (SIT) of Mumbai Police Cyber Cell...
Ban on MDH, Everest masala | India seeks details from food regulators of Singapore, Hong Kong
Unmesh GujarathiSprouts Exclusive India, the world's largest producer, consumer and exporter of spices, has sought details from food safety regulators of Singapore and Hong Kong, which has banned certain spices of Indian brands MDH and Everest due to quality...